बार्टी च्या विशेष कक्षा मार्फत अनु. जातीच्या महीला बचत गटांची नोंदनी औरंगाबाद जिल्हात दिनांक 14, जानेवारी 2016 रोजी विद्यापीठ नामविस्तार दिनांच्या दिनांच्या दिवशी विद्यापीठ परीसरात करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर" महापरिनिर्वाण दिन यांच्या स्मृति निमित्त दि. 06 डिसेंबर 2016 रोजी सामजीक न्याय भवन औरंगाबाद येथे वत्कृत्व स्पर्धा बार्टीच्या माध्यमातूनघेण्यात आल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थी दशे पासुनच आत्मसात करण्याची गरज शिक्षकांनी बोलून दाखवली व बार्टीच्या या उपक्रमा बद्दल शाळेकडून आभार मानले. औरंगाबाद विभागातील 8 जिल्ह्या मध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुर्ण विभागातून 9वी व 10 वीच्या 792 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला.
बार्टीच्या वतीने भारतीय संविधान ज्ञान स्पर्धा
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त
संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत .
मा. महासंचालक आर.एफ. ढाबरे व विभागीय
प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर संविधान
दिन हा औरंगाबाद व लातूर विभागातील समतादूतामार्फत
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली,
नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये अनुक्रमे म्हस्के गीता, कोठुळे
सर्वेश्वर, पाईकराव भाग्यश्री, लोंढे दीपक, सिद्धार्थ गोवंदे, मुंजाजी कांबळे,
तुषार कदम, शेख शेहनाज यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान रेंली काढण्यात आली तसेच
विविध कार्यक्रम राबविण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील ता. कन्नड येथे ४,५००
विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामुहिक संविधान प्रस्ताविक वाचन कार्यक्रम घेण्यात
आला.
संविधान बांधिलकी
महोत्सवांतर्गत संविधान ज्ञान स्पर्धेचे दि. २५/११/२०१६ रोजी आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानातील
समता, स्वातंत्र, बंधुता या मुल्यांची रुजवात विद्यार्थ्यानमध्ये व्हावी या उद्देशाने आयोजन करण्यात आले होते. या
परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. २६ नोव्हेंबर संविधान
दिनाच्या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून
प्रथम रु.१०००, द्वितीय रु.७५०, आणि तृतीय रु. ५००, क्रमांक काढून व प्रमाणपत्र देण्यात आले.
दिनांक ०६
डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ( महापरिनिर्वाण दिन) स्मृतिदिन हा खऱ्या अर्थाने
जनमाणसाक्रिया प्रेरणादायी ठरावा व त्यांच्या विचारांची रुजवात विद्यार्थी
दशेपासूनच व्हावी तसेच बार्टीचा मुल उद्देश साध्य होण्याकरिता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत .
मा. महासंचालक आर.एफ.
ढाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ डिसेंबर रोजी नववी
ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रकल्प अधिकारी अथवा समतादूत यांच्याकडे
दिनांक ४ डिसेंबर २०१६ पर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन विभागीय प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment